Sun. Oct 24th, 2021

पुणे- सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, 9 जण ठार

पुणे- सोलापूर मार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. लोणी – काळभोर वाक वस्ती येथे रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील तरुण हे दौंड तालुक्यातले असून ते रायगड येथे सहलीला गेले होते. सहलीवरून परतत असताना त्यांचा हा भीषण अपघात होऊन मृत्यू झाला.

चालकाचं नियंत्रण सुटल्याने त्यांची कार डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकवर जाऊन आदळली.

या अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण College students आहे.

हे यवत येथील रहिवासी आहेत.

पुणे सोलापूर हाय वे वर रायगडहून घरी परत येत असताना हा अपघात झालाय.

मृतांची नावं-

अक्षय भारत वाईकर

विशाल सुभाष यादव

निखिल चंद्रकांत वाबळे

सोनू ऊर्फ नूर महमद अब्बास दाया

परवेज आशफाक अत्तार

शुभम रामदास भिसे

अक्षय चंद्रकांत घिगे

दत्ता गणेश यादव

झुबेर अजिज मुलाणी

सर्वजण यवत येथून रायगड येथे फिरण्यास गेले होते.

रायगड पाहून सर्वजण घरी परत येत होते. पुणे सोलापूर महामार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर त्यांच्या एर्टिगा कार ड्रायव्हरचं वाहनावरील नियंत्रण सुटलं. गाडीने divider ओलांडून समोरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कारमधील 9 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तब्बल दोन किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *