Sun. Jan 16th, 2022

बेधुंद कारचालकांकडून वाहतूक कर्माचाऱ्याच्याच अपहरणाचा प्रयत्न!

मुंबईत आज सकाळी एका कारचालकाने वाहतूक कर्मचाऱ्याचंच अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळ जनक घटना घडली. वाहतूक कर्मचाऱ्याच्या संयमामुळे पुढील दुर्घटना टाळली.

काय घडलं नेमकं?

वाहतूक पोलीस विकास मुंडे हे छेडानगर येथे आपले कर्तव्य बजावत होते.

त्यावेळी मुंबई कडून ठाणे वाहिनीवर एक कार भरधाव वेगाने जात होती.

कारमध्ये तीन युवक होते.

कारमध्ये ते दारू पित असल्याचंही काही कार चालकांना दिसलं.

त्यांनी वाहतूक कर्मचाऱ्याला याबद्दल माहिती दिली.

वाहतूक कर्मचाऱ्यांनी कार थांबन्याचा प्रयत्न केला.

पण कारमधील युवक कार घेऊन पुढे जाऊ लागले.

वाहतूक कर्मचारी मुंडे या कारमध्ये बसले आणि अंडी कार थांबवण्यासाठी प्रयत्न करू लागले.

पण दारुच्या नशेत वेगाने कार चालवणाऱ्या युवकांनी कार थांबवली नाही.

मुंडे यांनी वरिष्ठांना कळवलं. त्याचबरोबर कार मधील युवकांशी समयसुचकता दाखवत कार थांबवायला लावली.

ही कार रमाबाई आंबेडकर नगर जवळ त्यांनी थांबवली.

तोपर्यंत इतर वाहतूक कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले.

त्यांना विक्रोळी वाहतूक पोलीस चौकीत कारसह आणलं.

या 3 युवकांपैकी एकजण फरार झाला आहे. वाहतूक पोलिसांनी इतर दोनजणांना पुढील कारवाईसाठी टिळकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपींची नावं विराज शिंदे आणि गौरव पंजवाणी अशी आहेत. हे दोघेही जण ठाण्यातील राहिवासी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *