Thu. Jun 20th, 2019

हौशी पर्यटकाला ‘हे’ पडलं महागात; चक्क समुद्रात घेऊन गेला कार

0Shares

उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक समुद्र किनारी भेट देतात. समुद्र किनारी लोकं पोहण्यासाठी, खेळण्यासाठी जातात. मात्र विरार येथील नवापूर समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकाने चक्क समुद्रात गाडी घेऊन गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या हौशी पर्यटकाने दुपारी भरतीच्या वेळीस घेऊन गेल्याने गाडी समुद्रात वाहून गेल्याचे समजते आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेमकी कशी अडकली गाडी ?

विरारच्या नवापूर समुद्र किनाऱ्यावर काही पर्यटक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आले होते.

मात्र एका पर्यटकाने चक्क आपली गाडी समुद्रात घेऊन गेल्याची घटना घडली आहे.

या हौशी पर्यटकाला आपली Ertiga गाडी समुद्रात नेणं चांगलंच महागात पडलं आहे.

समुद्राला दुपारी भरती असल्यामुळे ही गाडी बाहेर आली नाही.

या गाडीला बाहेर काढण्यासाठी ट्रॅकरची मदत घेतली.

मात्र  समुद्राच्या पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ट्रॅकरच्या मदतीने गाडी बाहेर आली नाही.

अनेक परिश्रम केल्यानंतर गाडीला बाहेर काढण्यात यश मिळाले.

या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: