Tue. Sep 27th, 2022

घरी मधुमेही व्यक्ती आहे? सध्याच्या कोव्हिड १९ च्या साथीमध्ये अधिक काळजी घ्या

नेहमीच्या फ्ल्यूपेक्षा कोव्हिड-१९ हा गंभीर आजार आहे, मधुमेहींसाठी हा आजार काकणभर अधिक गंभीर आहे. याचे कारण म्हणजेच मधुमेहींमध्ये कोव्हिड १९ च्या संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंती अधिक गंभीर असतात. डॉ. गायत्री घाणेकर यांच्यानुसार गेल्या वर्षभरातील आकडेवारीने हे सिद्ध करते की ‘मधुमेहींना कोव्हिड १९चा संसर्ग झाल्यास मधुमेह नसलेल्यांच्या तुलनेने मधुमेहींना येणारी अंतर्गत सूज अधिक तीव्र स्वरुपाची असते. कोव्हिड १९ चा संसर्ग झालेल्या मधुमेहीचे वय आणि आरोग्याची स्थिती यानुसार त्यांच्या निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींमध्ये फरक असतो.” तुम्ही घरातील निरोगी सदस्य असाल तर मधुमेही सदस्याला संसर्ग होऊ नये यासाठी तुम्ही अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. खालील पायऱ्यांचा अवलंब करा : जेव्हा अशा व्यक्तींना बाहेर जायचे असेल तेव्हा ते त्यांचे नाक व तोंड मास्कने झाकतील याची खातरजमा करा. तुमचे हात नियमितपणे धुवा, विशेषतः मधुमेहींना जेवण भरवताना किंवा त्यांची काळजी घेताना हात धुतलेच पाहिजेत. तुमच्या घरी न राहणाऱ्यांपासून किमान ६ फुटाचे अंतर ठेवून उभे राहा. तुमच्या घरातील सदस्य आजारी असेल तर जर शक्य असल्यास त्या व्यक्तीला वेगळी खोली द्या आणि दरवाजा बंद ठेवा. कुटुंबातील केवळ एकाच सदस्याला त्यांची शुशृषा करू द्या आणि तुमच्या घरातील ६५ वर्षांवरील व्यक्ती किंवा मधुमेहासारखा आजार असलेल्या व्यक्तींना अतिरिक्त सुरक्षा द्या. त्यांच्यात लक्षणे दिसत आहेत असे तुम्हाला वाटले तर तत्काळ डॉक्टरांची भेट घ्या. जेव्हा तुम्ही डॉक्टरला कॉल कराल तेव्हा तुम्ही रुग्णाचे ग्लुकोज रीडिंग सोबत ठेवा, जेणेकरून ते डॉक्टरांना सांगता येईल. इमर्जन्सी चेतावनी संकेतांकडे लक्ष ठेवा : श्वास घेताना त्रास होणे छातीत वेदना किंवा दाबल्यासारखे वाटणे संभ्रमावस्था, जे आधी दिसून आले नव्हते जागे राहणे कठीण जाणे ओठ किंवा चेहरा निळसर होणे यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर तातडीने वैद्यकीय मदत घ्या. मधुमेहींचे कौंटुबिक सदस्य असलेल्यांमध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता अधिक असते, त्यामुळे कृपया याची नोंद घ्या आणि काळजी घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.