Sun. Sep 19th, 2021

ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस कालवश

ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस (Cartoonist Vikas Sabnis) यांचं 27 डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं आहे. ते 69 वर्षांचे होते. ‘मार्मिक’ तसंच ‘लोकसत्ता’मधील त्यांची राजकीय भाष्य करणारी व्यंगचित्रं प्रसिद्ध होती. 50 वर्षांच्या कारकीर्दीत त्यांना राजकीय तसंच सामाजिक विषयांवर आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून टोकदार भाष्य केलं.

विकास सबनीस यांची कारकीर्द-

विकास सबनीस यांचा जन्म 12 जुलै 1950 रोजी झाला.

जे जे स्कूल ऑफ आर्ट्स कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं.

बाळासाहेब ठाकरे शिवसेना सुरू करण्यापूर्वी ‘मार्मिक’ मध्ये आपल्या फटकाऱ्यांतून राजकीय भूमिका मांडत.

शिवसेनेचा (Shivsena )राजकीय अवाका वाढू लागल्यावर बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ची जबाबदारी सबनीस यांच्यावर सोपवली.

12 वर्षं विकास सबनीस ‘मार्मिक’चं काम पाहत होते.

सबनीस यांच्यावर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) तसंच आर. के. लक्ष्मण (R.K. Lakshman) यांच्या व्यंगचित्रांचा विलक्षण प्रभाव होता.

मार्मिकनंतर लोकसत्ता तसंच अनेक दैनिकांमध्ये त्यांनी काढलेली व्यंगचित्रं गाजली.

सबनीस गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचारही सुरू होते.

मात्र उपचारांदरम्यान ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *