Wed. May 19th, 2021

प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पुलवामा हल्ल्याविषयी काही भाष्य करण्यास निवडणूक आयोगाची मनाई आहे.निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले असून आम्ही सत्तेत आलो तर आयोगालाच तुरुंगात टाकू, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी यांच्याविरुद्ध यवतमाळ येथील सभेत केले होते. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जिल्ह्य़ातील दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

नेमक प्रकरण काय ?

निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले असून आम्ही सत्तेत आलो तर आयोगालाच तुरुंगात टाकू.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी असे वक्तव्य यवतमाळ येथील सभेत केले होते.

संविधानाने आम्हाला बोलण्याचा अधिकार दिला आहे.असे ही ते म्हणाले आहेत.

आंबेडकर यांच्याविरुद्ध दहशत दाखविणे, धमकी देणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फौजदारी दंडसंहितेच्या कलम 503, 506 नुसार आणि 189 नुसार ही कारवाई करण्यात आली.

आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *