Fri. Apr 19th, 2019

आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल

19Shares

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भाजपच्या रामपूरच्या भाजपच्या उमेदवार जया प्रदा यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जात अश्लील शब्दात टीका केली होती. या विधानामुळे आझम खान यांच्यावर सर्व स्तरातून निंदा करण्यात येत आहे. विषेश म्हणजे आझम खान हे वक्तव्य करत असताना अखिलेश यादव हे स्टेजवरच उपस्थित होते. मात्र त्यांनी आझम खान यांना रोखण्याचा प्रयत्नसुद्दा केला नाही.अशी चर्चा देखील होत आहे.दरम्यान आझम खान यांनी जया प्रदा यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर एफआयआर दाखल झालं असून महिला आयोगाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं आहे.

महिला आयोगाकडून स्पष्टीकरणाची मागणी

समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांनी रविवारी जया प्रदांवर अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले.

या विधानामुळे आझम खान यांच्यावर सर्व स्तरातून निंदा करण्यात येत आहे.

रामपूरमधील प्रचार सभेत आझम खान यांनी हे जयाप्रदांबद्दल अश्लील टिप्पणी केली.

आझम खान यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका सुरु झाली आहे.

याप्रकरणी आझम खान यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली आहे.

महिला आयोगाने सुद्धा त्यांच्याकडून स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे.

तर मी त्यांच्याबद्दल बोललोच नाही असं म्हणत खान यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

2009 पासूनचं या दोघांमध्ये बरेच वाद झाले असल्याने ते चर्चेत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *