Tue. Oct 19th, 2021

स्मृती इराणींवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जयदीप कवाडेंविरोधात गुन्हा दाखल

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचा मुलगा जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते.  संविधान बदलण्याची भाषा करतात, मात्र संविधान बदलणे नवरा बदलण्याइतकं सोपं नाही असं जयदीप कवाडे यांनी म्हटलं होतं. जयदीप कवाडे यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय ?

जयदीप कवाडे हे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक आणि आमदार जोगेंद्र कवाडे यांचे पुत्र आहेत.

नागपूरमधून कॉंग्रेसकडून नाना पटोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

निवडणुका जवळ आल्यामुळे नाना पटोले यांनी प्रचार सभा घेण्यास सुरुवात केली आहे.

नागपुरातील बगडजंद भागात प्रचारसभेत जयदीप कवाडे यांची जीभ घसरली.

जयदीप कवाडे यांनी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींवर टीका केली आहे.

स्मृती इराणी संविधान बदलण्याची भाषा करत आहे. मात्र संविधान नवरा बदलण्याइतकं सोपं नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

जयदीप कवाडे यांचे भाषण संपवल्यावर नाना पटोले यांनी जयदीपला शाबासकीही दिली.

जयदीप कवाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जयदीप कवाडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती समोर आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *