Thu. May 13th, 2021

हंसिकाच्या ‘या’ पोस्टरमुळे धार्मिक भावना दुखावल्या, कोर्टात याचिका दाखल

हंसिका मोटवानी या अभिनेत्रीचा महा नावाचा एक चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरवरून एक वाद निर्माण झाला आहे. कारण या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हंसिका मोटवानी चिलीम ओढताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून तिच्याविरोधात आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.

याआधी हंसिका मोटवानी ही प्रभूदेवाच्या गुलेबागावाली या दाक्षिणात्य चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाने फारसा कमाल केला नाही. आता ती महा या चित्रपटात झळकणार आहे. पण हा चित्रपट येण्याआधीच त्यावरच्या पोस्टरने वाद निर्माण झाला आहे.

अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि दिग्दर्शक यू. आर. जमिल या दोघांविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात महा या सिनेमाची 2 पोस्टर्स रिलीज करण्यात आली. त्यातील एका पोस्टरमध्ये हंसिका मोटवानी एका आलीशान खुर्चीवर बसली आहे. भगवी वस्त्रे परिधान करून ती चिलीम ओढत आहे असे या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहे. याच पोस्टरवरून वाद निर्माण झाला आहे.

पट्टाली मक्कल काछीचे जानकीराम यांनी या संदर्भातील याचिका दाखल केली आहे. या पोस्टरमधून धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे त्यांनी त्यांच्या याचिकेत म्हटलं आहे. हंसिका मोटवानी आणि चित्रपटाचे दिग्दर्शक या दोघांविरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *