Tue. Aug 9th, 2022

अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरातही रोकड सापडली

ममता बॅनर्जी यांचे अत्यन्त निकटवर्तीय आणि पश्चिम बंगाल सरकारात शिक्षण मंत्री असलेल्या पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेने बंगाल सरकार अडचणीत आले आहे. पार्थ यांची खासमखास अभिनेत्री अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून सापडलेली संपत्ती डोळे पांढरे करणारी आहे. अर्पिता हिच्या पहिल्या घरावर छापा पडला तेव्हा २० कोटी रुपयांची रोकड सापडली होती. अर्पिताच्या दुसऱ्या घरावरच्या छापामारीत आणखी संपत्ती मिळाली आहे. बुधवारी अर्पिताच्या घरी सुरु केलेल्या छाप्यात २१ कोटी रुपयांची रोकड आणि पाच किलो सोन्याचे दागिने सापडले आहेत. आजवर शिक्षक भरती घोटाळ्यात सापडलेली संपत्ती यामुळे सुमारे ५५ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या छाप्यात सापडलेली संपत्ती ईडीच्या कार्यालयात नेण्यासाठी ट्रक वापरावा लागला आहे.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी पार्थ चॅटर्जी यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी केली आहे. तसेच सर्व पदांवरून हटवले आहे. याबाबतची माहिती अभिषेक बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. यापूर्वी गुरुवारी बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीयाच्या चौथ्या घराची झडती घेण्यात आली होती. अर्पिता मुखर्जीच्या आणखी एका घराची झडती घेतली असता सुमारे ३० कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.