Sat. May 25th, 2019

अन् 6 तासानंतर झाली मांजरीच्या पिल्लाची सुटका

0Shares

जयेश जयवंत टेलर हे उद्योगपती आपल्या कुटुंबासह सुरतहून मुलगी शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार म्हणून तिच्या व्हिसाचे काम करण्यासाठी आणि सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी गुरुवारी मुंबईत आले होते. शुक्रवारी सकाळी व्हिसाचं काम केल्यानंतर ते सिद्धिविनायकच्या दर्शनासाठी निघाले.

काही वेळाने सायन हॉस्पिटलच्या परिसरात त्यांना आणि आजूबाजूच्या नागरिकांना मांजर ओरडण्याचा आवाज येत होता. त्यावेळी संपुर्ण गाडी तपासल्यानंतर देखील मांजरीचा शोध लागला नाही. पोलिसांनी तब्बल 2 तास मांजरीचा शोध घेतला. पण मांजरीचा पत्ता लागला नाही, 2 तासाच्या तपासानंतर पोलिसांनी गाडी शोरुमध्ये नेली. तिथे गाडी पुर्ण उघडली, त्यानंतर गाडीच्या इंजिनमध्ये मांजरीचे पिल्लू असल्याचे दिसून आले. यानंतर इंजिनमधून या पिल्लाची सुखरूप सुटका करण्यात आली.

तब्बल 6 तासांनंतर गाडीच्या इंजिनातून या मांजरीच्या पिल्लाची सुटका झाली. त्यानंतर मांजरीला शोरुमच्या कर्मचाऱ्यांच्या आणि प्राणी मित्रांच्या मदतीने प्राण्यांच्या रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान समजले की मांजरीच्या अंगाला कोणत्याही प्रकारची जखम झाली नव्हती. त्यामुळे 6 तासांनंतर जीवनदान मिळालेल्या मांजरीच्या पिल्लाला पाहून आम्हाला देवाचेच दर्शन झाले, असे म्हणत जयेश यांनी सिद्धिविनायक मंदिरात न जाता थेट आपले घर गाठले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *