Tue. Aug 20th, 2019

Breaking News

‘डरपोक भारतास एक संधी मिळताच साफ करून टाकू’, जावेद मियाँदादची मुक्ताफळं

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर त्याचे पाकिस्तानात पडसाद अजूनही उमटत आहेत. पाकिस्तान…

भारतात चार दहशतवादी घुसल्याची सुरक्षा यंत्रणांची माहिती

भारतात चार दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे. दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानी ISI एजेंटनेही भारतात प्रवेश केल्याचं सांगण्यात येत आहे. या दहशतवाद्यांनी  अफ़गानिस्तानच्या पासपोर्टवर भारतात प्रवेश केला आहे.

चांद्रयान – 2 चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश इस्रोची माहिती

15 जुलैला चांद्रयान 2 मोहीमेला सुरूवात झाली. चांद्रयान 2 ने आज (मंगळवार) चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे. चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे.

जे उडून गेले ते कावळेच… सोडून द्या पवारसाहेब – शिवसेना

जे कावळे उडाले, त्या कावळ्यांचा इतर पक्षांच्या पिंजऱ्यातून पळवणारे कोण होते? पवारसाहेब तुम्हीच होता. राष्ट्रवादीत पंधरा वर्षे राहून सत्तेचे दाणे, वैरण खाऊन या कावळ्यांचे मावळे होऊ शकले नाहीत.

ज्येष्ठ संगीतकार जहुर खय्याम हाश्मी यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन

ज्येष्ठ संगीतकार जहुर खय्याम हाश्मी यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी जुहू येथील सुजॉय रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘कभी कभी’, ‘उमराव जान’, ‘फिर सुबह होगी’, ‘पर्बत के उस पार’, ‘रजिया सुलतान’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे.

पाक लष्करप्रमुखांच्या कार्यकाळात तीन वर्षांसाठी वाढ; इम्रान खान यांनी दिली मंजुरी

पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार जावेद बाजवा यांचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी वाढवण्याची मंजुरी पाक पंतप्रधान इम्रान खान…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूरग्रस्तांसाठी मोठ्या घोषणा

कोल्हापूर सांगली सातारा कोकण नाशिक भागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. आज…

विदर्भातील संततधार पावसामुळे संत्रा उत्पादकाचे मोठे नुकसान

मुसळधार पावसाने राज्यात थैमान घातले असून अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातील…

हुकुमशाही विरोधात ठाम पणे उभे राहिल्यामुळेच राज ठाकरेंना ईडीची नोटीस – बाळासाहेब थोरात

राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

पन्हाळ्याकडे जाणारा मुख्य मार्ग पुर्णपणे खचला, पर्यटनव्यवसाय ठप्प

कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीने ऐतिहासिक पन्हाळगडाकडे जाणारा मार्ग खचला असून  हा मार्ग पुर्वपदावर यायला अद्यापही पाच ते दहा दिवस लागणार आहेत. पन्हाळ्याकडे येणारा मुख्य मार्ग खचल्याने तर नागरिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य संपत आले असून त्यांची मोठी अडचण होत आहे.

Video : डोंबिवलीत थिएटरच्या बाल्कनीचा काही भाग कोसळून दोन जखमी

थिएटरच्या बाल्कनीचा  भाग कोसळून 2 जण जखमी झाल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे.  डोंबिवलीत मधूबन थिएटरच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने एक महिला आणि एक 6 वर्षीय मुलगी जखमी झाली. “मिशन मंगल” चित्रपटा दरम्यान ही घटना घडली.