Tue. Aug 20th, 2019

Breaking News

धक्कादायक! कोल्हापूरमध्ये फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटलं

कोल्हापूरमध्ये फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  कोल्हापूमधील शिरोळ तालुक्यातील आलासे येथे ही घटना घडली आहे. पेटती मेणबत्ती फ्रीजच्या जवळ ठेवली होती त्यामुळे फ्रीजचा स्फोट होऊन संपूर्ण घर पेटलं आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. कोहिनूर मिल प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. 22 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात  आले आहेत. असं सांगण्यात आलं आहें

अरुण जेटलींनी राबविलेल्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशात आर्थिक मंदी – सुब्रमण्यम स्वामी

मोदी सरकारच्या काळात माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून…

तणावाची परिस्थिती असताना जम्मूमध्ये मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार

लोकसभेसह राज्यसभेत जम्मू-काश्मीरमधील कलम 370 आणि कलम 35ए हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यानंतर काश्मीरमध्ये तणावाचे वातावरण…

भाजपात पुन्हा मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार – भाजपा उपाध्यक्ष

कोकणातील विरोधी पक्षातील काही आमदार भाजपात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड…

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्रींच वयाच्या 85 व्या वर्षी निधन

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांचे रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. दुपारी 12 वा. कारखाना कार्यस्थळावरच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

काबूलमध्ये लग्नसंमारंभात बॉम्बस्फोट,63 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक जखमी

काबूलमध्ये शनिवारी रात्री लग्नसंमारंभात आत्मघाती बॉम्बस्फोट झाला असून यामध्ये 40 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाल्याचं माहिती मिळाली आहे. यामध्ये अजूनही काही लोकांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.

बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल आणि रेश्मा बागल शिवसेनेच्या वाटेवर

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जवळील असलेले बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेच्या वाटेवर असून आठ दिवसात आपली भूमिका जाहीर करणार आहेत.

यवतमाळ मध्ये दारू लपवण्यासाठी चक्क देवाऱ्याचा वापर

आता गुन्हेगारही हाय टेक बनत आहेत. यवतमाळ येथील एका गावठी दारू विक्रेत्याने पोलिसांची नजर चुकविण्यासाठी चक्क देव्हाऱ्या खालीच भूमिगत टाके केले. त्यात एक ड्रम ठेवून कुलरमधील पाण्याच्या मोटारीचा वापर करीत त्याने अवैध दारू विक्रीला तंत्रिकतेची जोड दिली

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

रेल्वेच्या विविध कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर ब्लॉक ठेवण्यात आला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे, पश्चिम रेल्वे  या तिन्ही मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.

पालघर मधील समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पालघर – काल रात्रीच्या सुमारास महाराष्ट्र शेजारील दमण येथे एक स्पीड बोट संशयितरित्या दिसल्याच्या माहितीनंतर पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर तटरक्षक दल तसेच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग

दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता.