राजभवनातून होणार हंगामी अध्यक्षाची निवड
मुंबई-सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ 30 तासांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलेलं आहे.