Thu. Jan 27th, 2022

CBI संचालकपदी ऋषी शुक्ला यांची नियुक्ती

वरिष्ठ IPS अधिकारी ऋषी शुक्ला यांची CBI संचालकापदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी या संदर्भात पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत शुक्ला यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं होत.

काय घडलं बैठकीत?

या बैठकीत जवळपास 80 अधिकाऱ्यांच्या नावावर चर्चा झाली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षेतेखाली झालेल्या या बैठकीत सरन्यायाधीश रंजन गोगोई, मल्लिकार्जुन खरगे सहभागी झाले होते.

नव्या सीबीआय संचालकाच्या नियुक्तीला उशीर होत असल्याबद्दल सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी नाराजी व्यक्त केली होती.

CBI चे तत्कालीन संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यात वाद होता.

या वादामुळे केंद्र सरकारने वर्मा आणि अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं.

त्यानंतर सुप्रीम कोर्टानं वर्मा यांना पुन्हा CBIचं संचालकपद बहाल केलं होतं.

मात्र 24 तासात निवड समितीनं वर्मांची CBI च्या संचालकपदावरुन हकालपट्टी केली होती.

 

कोण आहेत ऋषी शुक्ला?

शुक्ला 1983 आयपीएस तुकड़ीचे अधिकारी

मध्यप्रदेशचे पोलीस महासंचालक म्हणून केलंय काम

सीबीआय संचालक म्हणून त्यांना मिळणार 2 वर्षांचा कार्यकाळ

शुक्ला मूळचे ग्वाल्हेरचे रहिवासी

मध्यप्रदेश पोलीस दलामध्ये विविध पदांवर केलंय काम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *