Thu. Sep 29th, 2022

अनिल देशमुखांची कोठडी वाढवण्याची सीबीआयची मागणी

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयच्या ताब्यात असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्यासह इतर आरोपींची कोठडी वाढवून घेण्याची मागणी सीबीआयने केली आहे. या आरोपींच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ करण्याची मागणी सीबीआयने केली आहे.

अनिल देशमुख यांना २ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. १०० कोटी वसुलीच्या आरोपांप्रकरणी सीबीआयने अनिल देशमुखांना ताब्यात घेतले. काही दिवसांपूर्वी विषेश न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. या अर्जावर ईडीने उत्तर दिले असून आर्थिक गैरव्यवहारामागे अनिल देशमुख यांचाच हात असल्याचा आरोप न्यायालयात केला आहे.

दरम्यान, न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनिल देशमुख, संजय पलांडे, कुंदन शिंदे यांची कोठडी आज संपणार असून त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सीबीआयने केली आहे. या आरोपींच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ करण्याची मागणी सीबीआयने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.