Mon. Jan 17th, 2022

पेपरफुटीची सीबीआय चौकशी?; फडणवीसांचे मुख्यमंत्र्याना पत्र

पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली आहे. तसेच सुपेंच्या घरावर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत कोट्यवधी रुपये आणि सोन्यांची दागिने सापडले, त्यामुळे राज्यातील परिक्षांमध्ये घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले  आहे. त्यामुळे याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पेपरफुटीची सीबीआय चौकशी होण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित केली आहे.

देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत पेपरफुटीची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यांनी ट्विट केले की, ‘पेपरफुटीची सीबीआय चौकशी झाली तर या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील. अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणार नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा.’

तसेच, ‘जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रितीश देशमुखकडे पोलीस भरतीची ओळखपत्रे सापडली. म्हणजेच आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलीस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसत आहेत. त्यामुळे या सर्व घोटाळ्यातील गुंता पाहता सीबीआय चौकशी व्हायला हवी’, असे फडणवीसांना ट्विट केले.

लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पेपरफुटीला केंद्रीय तपास यंत्रणेकडे देणार का? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *