Thu. Oct 21st, 2021

चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास सीबीआयची मनाई

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह इतर पाचजणांविरोधात गुन्हा दाखल केला.

यासंदर्भात सीबीआयने चंदा कोचर यांना लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

यानुसार चंदा कोचर यांना देश सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

काय प्रकरण?

आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत आपल्या खास मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा करून दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

चंदा यांनी वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योग समूहाला 300 कोटींचे कर्ज दिले होते.

2009 ते 2011 यादरम्यान चंदा कोचर यांनी पुन्हा 1575 कोटी रुपयाचे कर्ज दिले.

यानंतर व्हिडीओकॉन उद्योग समुहाने 30 जून 2017 ला कंपनीचे दिवाळे निघाल्याचे जाहीर केले.

22 जानेवारीला याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली.

चंदा कोचर यांच्या सोबत त्यांचे पती,व्हिडीओकॉन कंपनीचे दोन युनीट,आणि सुप्रीम ऊनर्जी या कंपन्यांचा देखील समावेश आहे.

2018 च्या मार्च-एप्रिलमध्ये दीपक कोचर आणि वेणूगोपाल धूत यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी केली होती.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *