Wed. Jun 26th, 2019

Videoconच्या कार्यालयावर CBIचा छापा

0Shares

Videocon च्या कर्जवाटप प्रकरणावरून CBI ने वेणूगोपाल धूत यांच्या Videocon समूह आणि NuPower Renewablesचे संस्थापक दीपक कोचर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरूवारी कारवाई केली असून Videocon आणि NuPowerच्या कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहे.

दीपक कोचर यांची पत्नी चंदा कोचर या ICICI बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका तसेच CEO होत्या. या काळात कोचर यांनी Videocon ला 3,250 कोटींचं कर्ज मंजूर करण्यात आलं. कर्जाच्या बदल्यात धूत यांनी कोचर यांच्या NuPowerमध्ये 64 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

ICICIने  Videoconला कर्ज देण्याच्या बदल्यात Videoconने दीपक कोचर यांना सहाय्य केल्याचं तक्रारीचं मूळ स्वरूप आहे. या आरोपांनंतर  चंदा कोचर यांना ICICI बँक सोडावी लागली होती.

 

 

प्रकरणाचा तपास

आरोपानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये चंदा कोचर ICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच CEO पदावरून निलंबित झाल्या होत्या.

CBIने गेल्या वर्षी मार्चमध्ये वेणूगोपाल धूत, दीपक कोचर, अन्य काहींच्या विरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू केली होती.

गुन्हा दाखल करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी केली जाते.

प्राथमिक चौकशी हा तपास प्रक्रियेचा भाग असतो.

पुरेसा पुरावा आहे का याची माहिती चौकशीत घेतात.

सत्कृतदर्शनी गुन्हा घडल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येतो.

मोठ्या प्रमाणावर तपासकार्य हातात घेतले जाते.

गुरुवारी CBIने कंपनीच्या मुंबई, औरंगाबादमधील कार्यालयांवर छापा टाकला.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: