लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात सीबीआयचे छापे

लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झालेली दिसून येत आहे. सीबीआयने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचा नवा गुन्हा दाखल केला आहे. त्या अनुषंगाने लालू यादव यांच्यासंदर्भात दिल्ली आणि बिहारमध्ये १७ ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत. शुक्रवारी सकाळी ही कारवाई कऱण्यात आली आहे. एक टीम राबडी देवींच्या सरकारी निवासस्थानीदेखील पोहोचली आहे. राबडीदेवींच्या घरी आलेल्या टीममध्ये महिला आणि पुरुष अधिकारी आहेत. या टीममध्ये १० अधिकारी आहेत. राबडींच्या घरी कोणालाही येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यामुळे बिहारच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे
मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात रेल्वे भरतीमध्ये कथित अनियमितता केल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचा नवा खटला दाखल करण्यात आला आहे. यानंतर सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. लालू यादव यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनाही नव्या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. सीबीआयने यादव आणि त्यांच्या मुलीवर भ्रष्टाचाराचा नवा गुन्हा दाखल केला आहे. लालू यादव यांची काही दिवसांपूर्वीच बिरसा मुंडा तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. १० लाखांच्या वैयक्तिक जामिनावर त्यांना हा जामीन मिळाला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर हा नविन गुन्हा दाखल झाला त्यामुळे आता लालूप्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.