Fri. Sep 30th, 2022

सीबीआयच्या कारवाईने राजद खवळले

बिहारमध्ये भाजपला मोठा बसला आहे. नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्या राजद पक्षासोबत युती करत सत्तांतर घडवले आहे. या राजकीय घडामोडीनंतर आता राजदच्या नेत्यांच्या नेत्यांवर सीबीआयने छापेमारी केली आहे.

बुधवारी सकाळी सीबीआयने राजदच्या प्रमुख चार नेत्यांच्या घरी धाड टाकली. सीबीआयने बिहारमध्ये तिसऱ्यांदा छापा टाकला आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या मॉलवर सीबीआयने छापे टाकले आहेत. गुरुग्राममध्ये तेजस्वी यादव यांच्या अर्बन क्यूबस मॉलवर सीबीआयने धाड टाकली आहे. तेजस्वी यादव यांची या मॉलमध्ये भागीदारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच कोषाध्यक्ष सुनील सिंह यांच्यासह दोन खासदारांच्या घरीही सीबीआयने छापेमारी केली आहे. माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी, बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयने राजदच्या नेत्यांवर केलेल्या कारवाईमुळे राजद खवळले आहे. या कारवाईप्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘भारताचे नाव बदलून भाजपा करा. देश आता राज्यघटनेनुसार नव्हे तर सगळं काही भाजपाच्या इशाऱ्यावर चालत आहे.’ अशी प्रतिक्रिया तेजस्वी यादव यांनी दिली आहे.

कोण सीबीआयच्या रडारवर?

उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या गुरुग्राममधील अर्बन क्यूबस मॉलमध्ये छापेमारी
राजद चे कोषाध्यक्ष आणि आमदार सुनील सिंह यांच्या घरी सीबीआयची छापेमारी
राजद खासदार फैयाज अहमद
राजद खासदार अश्फाक करीम
राजदचे माजी आमदार सुबोध राय

काय आहे प्रकरण ?

२००४-२००९ च्या रेल्वे भरती घोटाळ्याशी संबंधित प्रकरण
लालू यादव रेल्वेमंत्री असतानाचे प्रकरण
नोकरीच्या बदल्यात जमीनीची मागणी केली जात असे
पैसे घेण्यात धोका असल्याने नोकरीच्या बदल्यात जमीन घेण्यात आली.
बेकायदेशीर काम करण्याची जबाबदारी लालूंचे तत्कालीन ओएसडी भोला यादव यांच्यावर

4 thoughts on “सीबीआयच्या कारवाईने राजद खवळले

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.