उन्नाव बलात्कार प्रकरणाचे मुख्य आरोपी सेंगर यांच्या घरावर सीबीआयचा छापा

उन्नाव बलात्कार प्रकरणाचे मुख्य आरोपी आमदार कुलदीप सिंह सेंगर सध्या अटकेत आहे. त्यानंतर त्याच्या घरावर सीबीआयचे पथक दाखल झाले आहे, सीबीआयच्या पथकाने छापा टाकला आहे.

उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडीतेचा अपघात झाला यामध्ये तिच्या नातेनाईकांचा मृत्यू झाला तर ती आणि तिचा वकील गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकारानंतर हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आले आहे.

हा अपघात की घातपात अशी चर्चा सर्वत्र होत आहे. सर्वोच्च न्यायालाने गंभीर दखल घेत या प्रकरणावर तीन वेळा सुनावणी केली आहे. तसेच 7 दिवसात याप्रकरणाची चौकशी करत 45 दिवसात निर्णय देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सीबीआयच्या पथकाचा छापा

उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार सेंगर सध्या अटकेत आहे. सुप्रीम कोर्टात याचा खटला सुरु आहे.

आमदार सेंगर यांच्या घरावर काल सीबीआयच्या पथकाने छापा टाकला आहे. सीतापूर येथे तुरुंगात जावून चौकशी देखील केली आहे.

सीबीआयचे तीन सदस्य असलेले पथकाने काल तुरूंगात जावून ही चौकशी केली आहे.

सीबीआयच्या पथकानं पीडितेच्या कुटुंबीयांकडेही चौकशी केली होती. त्यानंतर आज सीबीआयने सेंगरच्या घरी छापा टाकला.

घराची झडती घेण्यात येत आहे. त्याच्याशी संबंधित अन्य ठिकाणीही अधिकाऱ्यांनी छापे टाकले असून सध्या या ठिकाणी झाडाझडती सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

Exit mobile version