Mon. Jan 17th, 2022

सीबीएसई १२ वी परीक्षेची सुनावणी स्थगित

सर्वोच्च न्यायालयात सीबीएसई आणि सीआयएससीई द्वारे आयोजित बारावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या पुन्हा एकदा याचिकेवरील सुनावणी स्थगित करण्यात आली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी स्थगित करण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहील होतं. तसेच बारावी परीक्षेबाबत केंद्र सरकारनं धोरण ठरवावं,परिक्षेबाबत एकच धोरण ठरवा, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे रविवारी यांनी केली होती.

केंद्र सरकारने यावर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत मागितली आहे. केंद्र सरकारने कोर्टात सांगितलं की, सरकार येत्या काही दिवसात बारावी बोर्ड परीक्षेबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. सीबीएसईची बारावीची परीक्षा रद्द करण्याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी सध्या ३ जूनपर्यंत टळली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *