Tue. Sep 28th, 2021

खुशखबर, यंदा CBSEची परीक्षा होणार सोपी; जाणून घ्या कशी!

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

कारण यंदाच्या बोर्डाच्या परिक्षेपासून प्रश्नपत्रिकांचे स्वरुप बदलण्यात आले असून ते विद्यार्थ्यांशी अनुकूल असे अधिक सोपे करण्यात आले आहे.

CBSEने त्यानुसार वस्तूनिष्ठ प्रश्नांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रश्नपत्रिकांमध्ये आजवर 10 टक्के वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जात होते. मात्र आता यात वाढ करुन ते 25 टक्के करण्यात आले आहेत.

यामुळे विद्यार्थ्यांचा परिक्षा देताना आत्मविश्वास वाढेल तसेच त्यांना परिक्षेत अधिक गुणही मिळवता येतील असे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

एखाद्या विद्यार्थ्याला जर एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत शंका असेल किंवा त्याला उत्तर येत नसेल तर त्याच्याकडे 33 टक्के जास्त प्रश्न उपलब्ध असतील.

मात्र यंदा विद्यार्थ्यांना विविध प्रकारे उत्तरे लिहीता येतील असे अधिक प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येक पेपरला उपविभागांमध्येही विभाजीत केले जाणार आहे.

उदाहरणार्थ, सर्व वस्तुनिष्ठ प्रश्नं एकाच भागात विचारण्यात येतील. त्यानंतर अधिक गुणांच्या प्रश्नांचा भाग असेल.

वस्तुनिष्ठ प्रश्नांव्यतिरिक्त इतर प्रश्न हे भागांमध्ये विभागलेले नसतील तसेच ते कोणत्याही क्रमाने विचारले जातील.

त्यामुळे विद्यार्थी अधिक सोईने चांगल्या प्रकारे परिक्षा देता येईल, असे CBSE च्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

प्रश्नपत्रिका फुटण्यापासून रोखण्यासाठीही यावेळी विशेष पावले उचलण्यात आली आहेत.

संवेदनशील वस्तूंना एकत्र करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केंद्रीय अधीक्षकांना विशिष्ट मोबाईल अॅप्लिकेशनचा उपयोग करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

त्यामुळे त्यांच्यावर लाईव्ह पद्धतीने नजर ठेवण्यात येणार आहे.

यावर्षी सुमारे 13 लाख विद्यार्थ्यांनी 12वीच्या परिक्षेसाठी नोंदणी केली आहे, तर 10वीच्या परिक्षेसाठी 18 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

2 दिवसांनी अर्थात 15 फेब्रुवारीपासून या परिक्षा सुरु होणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या परिक्षा 15 दिवस आधीच घेण्यात येत आहेत.

व्होकेशनल विषयांची परिक्षा फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत पूर्ण होणार आहेत त्यानंतर मार्चमध्ये शैक्षणिक विषयांवरील परिक्षांना सुरुवात होणार आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *