Thu. Aug 13th, 2020

पाच दहशतवाद्यांना काश्मिरात कंठस्नान; घुसखोरीचा डाव उधळला

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी सोमवारी कंठस्नान घातले.

 

कुपवाडा जिल्ह्यातील माछिल विभागात ही घटना घडली. हे पाचही दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत होते.

 

प्रत्यक्ष ताबा रेषेवर संशयास्पद हालचाल दिसल्याने सुरक्षा दलांनी या पाच जणांना रोखले. त्यानंतर त्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली.

 

गोळीबाराला प्रत्युत्तर देत सुरक्षा रक्षकांनी पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली. सुरक्षा दलाकडून या पाचही जणांची

ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *