Jaimaharashtra news

मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य आणि हार्बर मार्गावर तांत्रिक कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून शनिवारी ४ मे रोजी पश्चिम मार्गावर रात्री ११ वाजेपासून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. आज मध्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर नियोजीत करण्यात आला आहे. तसेच हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द येथे घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकमुळे २० मिनिटे लोकल उशीराने धावतील.

मेगाब्लॉक अपडेट –

मध्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत असणार आहे.

हार्बर मार्गावर वडाळा ते मानखुर्द येथे सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत असणार आहे.

तसेच पश्चिम मार्गावर शनिवारी रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक नियोजित केला होता.

हा ब्लॉक सांताक्रुझ ते माहिमदरम्यान अप जलद मार्गावर आणि डाऊन हार्बर मार्गावर नियोजित केला होता.

तसेच वसई रोड ते भाईंदर अप आणि डाऊन जलद मार्गावर घेण्यात आला.

त्यामुळे रविवारी म्हणजे आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.

यावेळी मेगाब्लॉक असल्यामुळे लोकल गाड्या नेहमीच्या वेळापत्रकापेक्षा २० मिनिटांनी उशीराने धावणार आहेत.

 

 

 

 

 

Exit mobile version