Tue. Dec 7th, 2021

लशींच्या दराबाबत केंद्राच्या सीरम, भारत बायोटेकला सूचना

देशात कोरोना लसीकरण मोहीमेला वेग येत असताना दुसरीकडे सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांनी आपल्या लसीचे दर राज्ये आणि खुल्या बाजारासाठी वाढवले आहेत. यावरून वाद सुरू झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याची दखल घेतली आहे.

कोरोना लसीच्या किंमतीवरून सुरु असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपावरून केंद्र सरकारने भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटला लसीचे दर कमी करण्यास सांगितले आहेत. कोरोना लसीच्या किंमतीवरून अनेक राज्यांनी आणि विरोधी पक्षाने केंद्र सरकारला लक्ष्य केले होते.

कोविशील्डची किंमत राज्य सरकारसाठी ४०० रुपये प्रतिडोस असेल, तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिडोस किंमत आकारण्यात येईल, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सांगितले. कंपनीचे सीईओ अदर पूनावाला यांनी १५० रुपये प्रतिडोस किंमतीत ही लस केंद्र सरकारला उपलब्ध करणार असल्याचं सांगितले. देशात १ मे पासून १८ वर्षावरील सगळ्यांना लस देण्यात येणार आहे. आजपासून ऑनलाइन नोंदणी सुरू होणार आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *