Jaimaharashtra news

अदर पूनावाला यांना केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा

गृह मंत्रालयाने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे अदार पूनावाला यांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. गृह मंत्रालयाकडून या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे. अदर पूनावाला यांना सीआरपीएफ संरक्षण देण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. सीरम इंस्टिट्यूटकडून संपूर्ण जगाभरात कोरोनाची लस पुरवली जात आहे.

सीरम इंस्‍टीट्यूट ऑफ इंडियाच्या यशात अदार पूनावाला यांची महत्त्वाची भूमिका आहे. आज भारताच्या दिग्‍गज व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश झाला आहे. महाराष्‍ट्रातील पुणे या ठिकाणी सीरम इंस्‍टीट्यूट ऑफ इंडियाचा जवळपास १०० एकरचा परिसर आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Exit mobile version