Sun. May 16th, 2021

बीएसएनएल बंद होणार?

बीएसएनएल अर्थात  भारत संचार निगम लिमिटेड ही सरकारी टेलिकॉम कंपनी गेले अनेक वर्ष तोट्यात आहे.

यामुळेमचं सरकारने कंपनीला सर्व पर्यायांबाबत तुलनात्मक विचार करण्यास सांगितलं आहे.

कंपनी बंद करण्याचा पर्याय सुद्धा आहे.

रिलायंस जिओच्या प्रवेशामुळे परिणाम?

  • 2017-18 या आर्थिक वर्षात बीएसएनएलचा एकूण तोटा 31,287 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
  • बीएसएनएलच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची केंद्रीय दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांच्यासोबत बैठक झाली.
  • रिलायंस जिओच्या प्रवेशामुळे झालेले परिणाम, कंपनीची सध्याची आर्थिक परिस्थिती, कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीच्या आकडेवारीची संपूर्ण माहिती बीएसएनएलचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव यांनी प्रेझेंटेशनद्वारे दिली.
  • बैठकीत सरकारकडून बीएसएनएलला सरकारकडे उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांवर विचार करण्यास सांगण्यात आलं.
  • बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे , 2019-20 पासून स्वेच्छानिवृत्तीचं वय कमी कमी केल्यास, कंपनीचे 3 हजार कोटी रुपये वाचतील असंही बैठकीत सांगण्यात आलं
  • कंपनीला नव्याने उभं करण्याबरोबचं कंपनी बंद करण्याचा पर्यायाचाही समावेश असल्याने  कंपनीसमोर मोठं आव्हान आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *