Mon. May 23rd, 2022

जम्मू-काश्मीरमध्ये सरकारी खात्यांतील 50 हजार रिक्त पदे; मेगाभरती सुरू

जम्मू -काश्मीरमध्ये विविध सरकारी खात्यांतील जागा भरण्यात येणार असल्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. सरकारी खात्यांतील 50 हजार जागा रिक्त असल्यामुळे जागा भरण्यासाठी काश्मिरी तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे मलिक यांनी सांगितले आहे.

काय आहे राज्यपाल यांची घोषणा ?

बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यपाल यांनी विविध सरकारी खात्यांतील जागा भरण्यात येणार असल्याची घोषणा केली.

तसेच या खात्यांतील जागा भरतीसाठी काश्मिरी तरुणांनी लाभ घ्यावा असे मलिक यांनी सांगितले आहे.

सरकारी खात्यांतील 50 हजार जागा रिक्त असल्याची माहिती राज्यपालांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मिरमधील कलम 370 आणि कलम 35ए रद्द करण्यात आले आहे.

तसेच येत्या सहा महिन्यात जम्मू-काश्मिरमध्ये महत्त्वाची कामे होणार असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे.

राज्याचा विकास होण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे मलिक म्हणाले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.