मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत

मुंबईतील माटुंगा रेल्वे स्थानकाजवळ गुरुवारी रात्री झालेल्या अपघातामुळे लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. दादर-पद्दुचेरी एक्सप्रेस माटुंगा स्थानकावर एकमेकांसमोर आल्या आणि हा अपघात झाला. त्यामुळे सकाळी कामाला निघालेल्या मुंबईकरांचे मोठे हाल झाले आहेत. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे तसेच रेल्वे उशीराने आणि धिम्या गतीने असल्यामुळे अनेक प्रवासी रुळावरून चालत गेले आहेत.
शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास माटुंगा रेल्वेस्थानकाजवळ दादर-पद्दुचेरी एक्सप्रेसचे तीन डबे घसरल्यामुळे अपघात घडला. रुळावरून घसरलेल्या तीन डब्यांपैकी दोन डबे रुळावर आणण्यात प्रशासनाला यश आले. तर सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी रात्री पासुन रेल्वे प्रशासनाने रुळावरून घसरलेले डबे बाजूला करण्याचे काम सुरु केले होते. तर त्यांच्या प्रयत्नाला आज शनिवारी दुपारी १ वाजता यश मिळाले.