Mon. Dec 6th, 2021

कोकण रेल्वेची ७२ विशेष गाड्यांची घोषणा

राज्यात कोरोना निर्बंध अद्याप कायम असतानाही कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. ही घोषणा करताच तिकीट आरक्षणासाठी गणेशभक्तांची झुंबड उडाली.

कोकणात जाणाऱ्या काही गाड्यांची प्रतीक्षा यादी तर एका दिवसात ३०० च्याही पुढे गेली आहे. येत्या १० सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सवानिमित्त मध्य आणि कोकण रेल्वेने ७२ विशेष गाड्यांची घोषणा केली. या गाड्या ५ सप्टेंबरपासून सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आरक्षण सुरू होताच काही गाड्यांसाठी प्रतीक्षा यादीही लागली आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील करोना रुग्णांची संख्या म्हणावी तशी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यांचा आढावा घेऊन गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी नियमावली निश्चित केली जाईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *