Thu. May 6th, 2021

कोव्हिशिल्डच्या उत्पादनाकरिता सीरमने बँकांकडून घेतले कर्ज

कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादन वाढविण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) सरकारकडून मिळणाऱ्या निधीची वाट न पाहता बँकांकडून कर्ज घेतले आहे. केंद्र सरकारने सीरमला नुकतेच 3 हजार कोटी रुपयांची आगाऊ रक्कम देण्याचे जाहीर केले होते. देशात कोरोनाबाधितांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. यातून कस बाहेर पडता येणार याचा विचार सरकार करत आहे. केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्तींचेही लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे सीरमचे सीईओ आदार पुनावाला यांनी कोरोना लशीच्या उत्पादनासाठी 3 हजार कोटी रुपयांची गरज लागले असं म्हटलं आहे.

सीरमने ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेनकाच्या मदतीने कोव्हिशिल्ड ही कोरोना लस तयार केली होती. केंद्र सरकारने जाहीर केलेली 3 हजार कोटी रुपयांची रक्कम येत्या आठवड्यात मिळेल, असा विश्वास सीरमने व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार्मा कंपनी, डॉक्टर व केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतल्यानंतर सीरमला 3 हजार कोटी तर भारत बायोटेकला 1,500 कोटी रुपये देण्याचे जाहीर केले आहे. जगभरात कोव्हिशिल्डची किंमत 750 ते 1,500 रुपये प्रति डोस आहे. मात्र त्या तुलनेत भारतात लशीची किंमत परवडणाऱ्या दरात असल्याचं सीरमने म्हटले आहे. सीरमकडून जुलैपर्यंत 20 कोटी डोस होतील तर भारत बायोटेकडून 9 कोटी डोस सरकारला पुरविण्यात येणार आहेत. या प्रति डोसची किंमत 150 रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *