Thu. Dec 2nd, 2021

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून केंद्राचे राज्यांना पत्र

देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही. आरोग्य तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे अनेक राज्यांनी निर्बंध काही प्रमाणात हटवले आहेत. यामुळे केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. कोरोनावरील लसीकरण वाढवण्यासोबतच निर्बंध हटवताना काळजी घ्या, असं केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी कोरोनवारील लसीकरण मोहीमेचा वेग वाढवावा, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. तसंच कोरोनाच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासही सांगितलं आहे. केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे.कोरोनाच्या व्यवस्थापनासंबंधी योग्य रणनीतीवर लक्ष द्यावे. असं भल्ला यांनी पत्रात नमूद केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *