Wed. Jan 19th, 2022

राज्यसभेतील विरोधकांच्या गदारोळामुळे व्यंकय्या नायडू भावूक

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभेत मंगळवारी पेगॅसस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी जोरदार गदारोळ घातला. दरम्यान, काही विरोधी खासदारांनी टेबलावर चढून गोंधळ घातला. या प्रकारानंतर राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू भावूक झाले. राज्यसभेत विरोधकांकडून घालण्यात आलेल्या गदारोळामुळे सभापती व्यंकय्या नायडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही, असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

राज्यसभेत मंगळवारी पेगॅसस आणि कृषी कायद्यांवरुन विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधी पक्षातील काही खासदार वेलमध्ये जाऊन टेबलावर चढले आणि आसनाच्या दिशेने पुस्तके फेकली, घोषणा देत कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली. या गोंधळानंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं.

‘काल जेव्हा काही सदस्य बाकावर बसले आणि काहीजण वरती चढले तेव्हा या सभागृहाचं पावित्र्य नष्ट करण्यात आलं. विरोधकांच्या गदारोळामुळे आपण रात्रभर झोपू शकलो नाही. मला फार वाईट वाटलं, खूप दु:ख झालं. मात्र हे दु:ख व्यक्त करण्यासाठी काय करावं मला कळलं नाही. मी रात्रभर झोपलो नाही’, असं व्यंकय्या नायडू म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *