23 वर्षीय तरुणीने बलात्कारी साधूचं गुप्तांग कापलं
वृत्तसंस्था, केरळ
अनेक वर्षांपासून सातत्यानं बलात्कार करणाऱ्या नराधम साधूचं एका 23 वर्षीय तरुणीनं गुप्तांगच कापलं. केरळमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेत बलात्काराच्या प्रयत्नात जखमी झालेल्या आरोपीला नंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
‘महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखतात. त्यांच्या कुटुंबियांचं एकमेकांच्या घरी येणं जातं होतं’, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या ६ वर्षापासून आरोपी आपल्याला छळत होता अशी तक्रार पीडित महिलेने केली.
या प्रकरणी आरोपीविरोधात बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर महिलेविरोधात कुठलीही तक्रार दाखल झालेली नाही.