Tue. May 18th, 2021

टेन्शनमुक्त करणारा ‘चमन बहार‘


शशांक पाटील : सध्या कोरोनामुळे सर्वत्र टेन्शनयुक्त वातावरण त्यातच २०२० मध्ये इरफान खान, ऋषीजी यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसह तरुण सुशांत सिंगची आत्महत्या या सगळ्यामुळे २०२० बरच डिप्रेशनमध्ये गेलं. अशात दर्जेदार फिल्म आणि वेबसिरीजसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नेटफ्लिक्सने एक हलकी-फुलकी टेन्शनमुक्त करणारी ‘चमन बहार‘ ही वेबसिरीज आपल्या भेटीला आणलीयं. तिचाच हा हलका-फुलका रिव्ह्यू.

चमन बहारमध्ये दिग्दर्शक अपूर्व धार बडगाईं याने छत्तीसगडच्या एका छोट्याशा शहरातील एका पानवाल्याची कहानी तिथल्या रोजमर्राच्या वातावरणातून दाखवली आहे. तर चमन बहारमधील बिल्लू हा एक छोटा पण सक्सेफुल दुकानदार बनायचं स्वप्न पाहत असतो. त्यात बिल्लू आपल्या पहिल्या वहिल्या प्रेमाच्या नादात कसा गुंडाळला जातो आणि पुढे कसे एक एक किस्से घडतात हे यात दाखवलंय. मग तिथली टवाळखोर मुलं, नेतागिरी करणारे छुटवय्ये नेते, दंबगाई करणारे पोलिस अशी सर्वांचा छोटा छोटा रोल असणारी दिड तासाची ही मूव्ही तुम्हाला सद्या असणारा आसपासचा तणाव हलका करायला नक्कीच मदत करेल. स्टारकास्ट म्हटलं तर लीड रोलमध्ये हिरो म्हणून वेब सिरीज विश्वातील सुपरस्टार जितेंद्र कुमार अर्थात आपला जितू भैय्या दिसून आलाय. जितू भैय्याने पानवाल्या बिल्लूच जे कॅरेक्टर घेतलंय ते माझ्या मते त्याच्या आतापर्यंतच्या अँक्टींगमधला एका दर्जेदार आणि बेस्ट पिस आहे. सोबतच असणाऱ्या सर्व नवख्या कलाकारांनी अगदी परफेक्ट कॅरेक्टर पकडलयं.

सध्या प्रेक्षकांना भल्या मोठ्या स्टारकास्ट पेक्षा नवखे आणि अगदी आपल्यातले कलाकार पाहायला फार आवडतं. ही गोष्ट नेटफ्लिक्सने बरोबर हेरली आहे. चमन बहारमधला जितू भैय्या सोडला तर इतर कलाकार इतके नवखे आहेत कि त्याचा इन्सटाग्राम पहाता अगदी 400-500 च्या घरातच त्यांचे फाँलोवर्स असतील. पण त्यांनी केलेल्या उत्तम अँक्टींगमुळे त्यांना भविष्यात चांगली प्रसिद्धी आणि काम मिळो अस पाहणाऱ्या प्रत्येकाला वाटेल. तर शेवटी एवढच सांगतो की, चमन बहार फिल्म एखादी सस्पेंस थ्रीलर नसली तरी उत्सुकता वाढवणारी आहे. त्यामुळे तुमची उत्सुकता मी तोडत नाही पण इतकच सांगतो की काही वर्षापूर्वी सोनम गुप्ता बेवफा हे या नोटांनी घातलेला गोंधळाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की ही मूव्ही पाहा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *