Jaimaharashtra news

हवामान खात्याचा अंदाज ; विदर्भासह कोकण व गोव्या सह बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता

विदर्भासह कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी शुक्रवारपर्यंत ९ जुलै पासून पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे . तसेच मध्य महाराष्ट्र आणि  तुरळक भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पोषक वातावरणाच्या अभावामुळे राज्यात मॉन्सूनची वाटचाल गेल्या काही दिवसांपासून मंदावली आहे. सोमवारी ५ जुलै ला मात्र कोकण व गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस पडला.
दरम्यान, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी बुधवार ७ जुलै पासून पोषक वातावरण तयार होणार आहे. बंगालच्या उपसागारावरुन बाष्पयुक्त वारे पुढील तीन दिवसांत देशाच्या वायव्य भागात प्रवेश करतील. परिणामी मॉन्सूनचा प्रवास हा दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि पश्‍चिम उत्तर प्रदेशाच्या काही भागात १० जुलैपर्यंत होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील आठवडाभर पुणे शहरात आकाश ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Exit mobile version