Jaimaharashtra news

नाशिक-पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाट ठरतोय जीवघेणा!

नाशिक पुणे महामार्गावर दगड कोसळल्याची घटना घडलीय. संगमनेर तालुक्यातील चंदनापूरी घाट येथे महामार्गावर सतत मोठ मोठे दगड कोसळत असल्यानं हा भाग जीवघेणा झाला आहे. कोसळणाऱ्या दरडी लवकरच काढल्या गेल्या नाहीत तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

नाशिक पुणे महामार्गावर असणाऱ्या चंदनापुरी घाटात सतत मोठ मोठे दगड कोसळत आहेत.

आजही मोठाले दगड थेट महामार्गावर येऊन पडले.

सुदैवाने कोणतंही वाहन यावेळी रस्त्यावर नसल्याने मोठा अनर्थ टळलाय.

महामार्ग पोलीस आणि नागरीकांनी रस्त्यावर पडलेले दगड बाजूला काढून तुर्तास रस्ता मोकळा केलाय.

मात्र हे दगड रस्त्यावर कोसळणं ही नित्याची बाब झाली आहे.

महामार्ग बनवताना मोठाले डोंगर फोडून रस्ता बनवला खरा, मात्र आता या रस्त्यालगत असणाऱ्या डोंगरावरून दरडी कोसळतायत.

डोळ्यांना हा परिसर नयनरम्य वाटत असला तरी अशा प्रकारच्या दरड कोसळल्याने मोठी दुर्घटना होऊ शकते. नाशिक पुणे महामार्गावर दररोज हजारे वाहनांची ये जा सुरू असते अशावेळी जर ही दरड कोसळली तर मोठी दुर्घटना होवू शकते त्यामुळे धोकादायक झालेल्या दरड लवकर हटवण्याची गरज आहे..

Exit mobile version