Mon. Dec 16th, 2019

भाजपाचे प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांतदादा पाटील ?

हायकमांड देईल ती जबाबदारी स्विकारण्याची तयारी असल्याचे विधान महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा मंत्रीमंडळात समावेश झाल्याने भाजपा प्रदेशाध्यक्षची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील यांनी यासंदर्भात वक्तव्य केले असल्याचे म्हटलं जात आहे.
नेमकं काय घडलं ?
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची वर्णी मंत्रीमंडळात लागल्याने भाजपा प्रदेशाध्यक्षची जागा रिक्त झाली आहे.
त्यामुळे नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू झाला आहे.
कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी हायकमांड देईल ती जबाबदारी स्विकारणार असल्याचे म्हटलं आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी याच पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केले असल्याचे म्हचलं जात आहे.
त्यामुळे प्रदेशाध्यक्षची जागा चंद्रकांतदादा पाटील यांना देणार का ? असे प्रश्न उपस्थित झाले आहे.
यापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते.
मात्र लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले.
त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जागा रिक्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *