Sun. Jan 16th, 2022

रावसाहेब दानवे यांचा राजीनामा, भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील!

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच BJP चे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या जागी आता मंगलप्रभात लोढा यांची नेमणूक करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकांनंतर BJP पुन्हा सत्तेमध्ये आला आहे.

खा. रावसाहेब दानवेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालंय.

त्यामुळे महाराष्ट्रात एक पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष नेमण्यात यावा, या हेतून त्यांनी राजीनामा दिला आहे.

त्यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा सुपुर्द केला.

त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील यांची BJP महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय.

कोण आहे चंद्रकांत दादा पाटील ? 

राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री 

कोल्हापूर, पुण्याचे पालकमंत्री 

अमित शहा यांचे अंत्यत जवळचे समजले जातात

1980 पासून अभाविपमध्ये काम सुरु केलं 

अभाविपमध्ये अखिल भारतीय मंत्री पदापर्यंत मजल

2004 पासून भाजप संघटनेमध्ये कामाला सुरुवात

पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेचे आमदार


आशिष शेलार यांचीदेखील राज्य मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे.

त्यामुळे त्यांच्यावर असणारी मुंबई BJP अध्यक्षपदाची जबाबदारी आता मंगलप्रभात लोढा यांच्यावर सोपवण्यात आलीय.

कोण आहे मंगल प्रभात लोढा ? 

मलबार हिल या उच्चभ्रू मतदारसंघाचं लोढा प्रतिनीधीत्व करतात

1995 पासून या मलबार हिल मतदारसंघातून  ते निवडूण येताहेत

आतापर्यंत पाचदा आमदार म्हणून निवड

लोढा बिल्डर या देशातल्या अग्रगण्य बांधकाम कंपनीचे मालक

लोढा ट्रस्टद्वारे अनेक लोकोपयोगी काम केली जातात

लोढा यांच्याकडे भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे बदल घडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *