Tue. Jun 18th, 2019

“राज ठाकरे हे प्रगल्भ नेते, पण…”, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

268Shares

राज ठाकरे हे खूप प्रगल्भ नेते आहेत, मात्र स्वतःच्या पक्षाचे उमेदवार उभे नसताना त्यांनी केवळ भाजपवर टीका करण्याची भूमिका घेतल्याचं आपल्याला खूप दुःख असल्याचं मत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलंय. जळगाव येथे भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते आले होते त्यावेळेस त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

राज ठाकरे यांना टीका करायचीच होती, तर तर दोन्ही पक्षांवर करायची होती.

मात्र त्यांनी केवळ भाजपावरच टीका केली.

त्यामुळे, काँग्रेस पक्ष एवढा चांगला आहे का, असा सवाल देखील उपस्थित होतो.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल  ठेऊन पुढे जात असलेल्या राज ठाकरेंच्या अशा भूमिकेचं आपल्याला दुःख आहे.

स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही काँग्रेसला मदत केली नाही.

प्रत्येकवेळी विजय मिळेल की नाही यापेक्षा राज ठाकरे यांनी मोजक्या दहा बारा जागांवर लक्ष केंद्रित करून लोक सभेची निवडणूक लढवायला हवी होती आणि आपल्या पक्षाचं वेगळे अस्तित्व दाखवायला हवं होतं असंही पाटील म्हणाले.

भाजप मेळाव्यातील हाणामारी दुर्दैवी

भाजपा मेळाव्यात झालेल्या हाणामारीबद्दलही चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हा प्रकार हा अतिशय दुर्दैवी असून या घटनेची पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर अतिशय गंभीररीत्या दखल घेण्यात आली आहे.

पुढील काळात दोघांची बाजू ऐकून घेत दोषींवर पक्ष निश्चित कारवाई करेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

268Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *