चंद्रकांत पाटलांचा अशोक चव्हाणांवर निशाणा

मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने पारित केलेला कायदा रद्द ठरवत राज्य सरकारला धक्का दिला. त्यातच राज्यात महाविकासआघाडी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. गुरुवारी संध्याकाळी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अशोकराव, जे तुम्हाला जमलं नाही, त्याचं खापर तुम्हाला देवेंद्रजींच्या डोक्यावर फोडता येणार नाही. तुम्ही शासन करताय ना? मग जबाबदारी घ्या’, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

‘आत्ताही बॉल तुमच्याच कोर्टात आहे. १०२व्या घटनादुरुस्तीनुसार त्या त्या राज्याच्या मागास आयोगाने त्या राज्यातल्या एखाद्या जातीला मागास ठरवायचं. मग ते केंद्राच्या मागास आयोगाला पाठवायचं. मग त्यांनी ते राष्ट्रपतींना पाठवायचं. आणि नंतर पुन्हा कायदा राज्य सरकारनेच करायचा आहे. राज्य सरकार आपली जबाबदारी झटकू शकत नाही. महाराष्ट्रात मागास आयोगच नाहीये. केंद्रात आहे. गायकवाड कमिशनची मुदत संपल्यानंतर नवीन मागास आयोगाची नियुक्ती केलेली नाही. ती आधी करा’, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Exit mobile version