Thu. Sep 29th, 2022

पक्षाने सांगितल्यास मी मुख्यमंत्री पण होईन सोडतो की काय?- चंद्रकांत पाटील

पक्षाने सांगितल्यास मी मुख्यमंत्री पण होईन सोडतो की काय? चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत  पुण्यात असं वक्तव्य केलं आहे.

पक्षाने सांगितल्यास मी मुख्यमंत्री पण होईन सोडतो की काय? चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत  पुण्यात असं वक्तव्य केलं आहे. आदित्य ठाकरे मध्ये मुख्यमंत्री पदाची क्षमता आहे की नाही हे लोकं ठरवतील, लोकशाही आहे. असं ही ते म्हणाले आहेत.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

पक्षाने सांगितल्यास मुख्यमंत्री पण होईन सोडतो की काय? चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री पदाबाबत  पुण्यात असं वक्तव्य केलं आहे.

ज्यांचा हिशेब चुकता करायचाय त्यांना आम्ही घेणार नाही, मात्र घेतलं त्यांना तावून सुलाखून घेतलं आहे.

आदित्य ठाकरे मध्ये मुख्यमंत्री पदाची क्षमता आहे की नाही हे लोकं ठरवतील, लोकशाही आहे,एकनाथ खडसे यांनी भाजपसाठी खूप काम केलंय, नाथाभाऊंबद्दल सर्वांना आदर आहे.

माझी विधान परिषदेची टर्म अजून एक वर्ष बाकी त्यामुळे पक्ष सांगेल ती जबाबदारी पार पाडणार,भाजपमधील इनकमिंगमुळे पक्षाची संस्कृती बदलणार नाही,पक्षातील निष्ठवंताना पक्षाने पद दिली आहेत.

एक फक्त विखे आहेत,मात्र सरकार चालवत असतांना अनुभवी व्यक्ती लागतात म्हणून त्यांना संधी देण्यात आली आहे. आमच्या संघटनेत नवीन लोकांना अडजस्ट करून घेण्याची क्षमता आहे, मात्र जे ऑड आहेत ते आपोआप बाहेर पडतील.

मुख्यमंत्रीबाबत अमित शहा, उद्धव ठाकरे आणि पक्ष ठरवेल,आता तीन आलेत निवडणूक अजून बाकी आहे,अजून येतील,शरद पवारांनी तीन गेलेत त्याचा धसका घेतलाय अजून जातील त्याची मानसिकता त्यांनी ठेवावी.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.