Sun. Jun 20th, 2021

शरद पवार प्रसिद्धीसाठी ‘ED’ चा इव्हेंट करतायेत – चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडी चौकशी संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारचा काहीच संबंध नाही. मात्र सरकार आकसाने वागतय,

Chandrakant patil

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ईडी चौकशी संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारचा काहीच संबंध नाही. मात्र सरकार आकसाने वागतय,  असं म्हणत लोकांची सहानुभूती मिळवत आहे. कारवाई होते म्हणून निषेध करतात. हाच निषेध छगन भुजबळ यांना अटक झाली त्या वेळेस का निदर्शने केली नाहीत, असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे.

त्यावेळेस का केलं नाही याच उत्तर द्या, असं म्हणत  इव्हेंट करत असल्याचा आरोपही चंद्रकांत पाटलांनी केला आहे. काही आक्षेप असेल तर कोर्टात जा, बीजेपीच्या कार्यालयाला काळे फासून काय होणार आहे. इव्हेंट करून प्रसिद्धी मिळवत आहेत. असं ही ते म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी राज्य सहकारी बँकेतील भ्रष्टाचार हा आघाडीचे सरकार असताना झाला. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कारवाई केली आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी आकसाने कारवाई केली असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

राज्याचा आणि केंद्राचा कुठलाही सहभाग नाही. या सर्व संस्था स्वायत्त असल्यामुळे त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *