Mon. Dec 16th, 2019

कोल्हापूरला उद्धव ठाकरेंनी मंत्रिपद देण्याची गरज आहे – चंद्रकांत पाटील

लोकसभा निवडणुकीचा नुकताच निकाल लागला आहे. यामध्ये देशात पुन्हा मोदी सरकार असेल तर राज्यात 41 जागा मिळवून पुन्हा भाजप-सेना युतीचा डंका वाजला आहे. तर काँग्रेसला केवळ 1 तर राष्ट्रवादीला 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडीनं 34 लाख मत मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 9 जागा पाडल्या आहेत. कोल्हापुर, हातकणंगले मतदारसंघाचा धक्कादायक निकाल लागला आहे. यामुळे एकाच वेळी दोन खासदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद द्यायला हवं असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील?

केंद्रात युतीची एकहाती सत्ता आल्यानंतर आता मंत्रीपदाच्या चर्चा रंगायला सुरवात झालीय.

एकाच वेळी दोन खासदार देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याला उद्धव ठाकरे यांनी मंत्रिपद देण्याची गरज असल्याचे सूचक वक्तव्य महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल आहे.

त्यामुळे कोल्हापूरला मंत्री पदाची संधी मिळणार का ? याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिलं आहे.

खरतर कोल्हापूरने दहा पैकी सहा आमदार देऊन जिल्हा भगवा केला.मात्र जिल्ह्याच्या वाट्याला सेनेकडून काहीच मिळाले नाही.

आता तर दोन खासदार देऊन कोल्हापूरकरांनी सेनेला मोठी ताकद तर दिलीच शिवाय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्नही पूर्ण केले आहे.

त्यामुळे याची परतफेड म्हणून उद्धव ठाकरे कोल्हापूरच्या पारड्यात मंत्रिपद देणार का हेच पाहणे महत्वाचे आहे.

असे झाले तर कोल्हापूरला प्रथमच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *