Tue. Dec 7th, 2021

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा

लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता…

काही  दिवसांपासून भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. शरद पवार यांनी  खडसेंबाबत केलेल्या सूचक विधानानंतर राष्ट्रवादीतील हालचालींना वेग आला आहे. 

काही दिवसांपूर्वी खडसेंबाबत ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या ऑडिओ क्लीपमध्ये एका समर्थकाने थेट खडसेंना फोन करुन राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात विचारणा केली असता यावर खडसे यांनी म्हटलं की अगोदर तिकडून प्रस्ताव तर येऊ द्या, ते आपल्याला मानाचं स्थान देणार का, याची खात्री करुनच आपण प्रवेश करूया, असे खडसेंनी म्हटले होतं. खडसेची ही ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.


एकनाथ खडसेबरोबर त्यांच्या कन्या रोहिणी खडसे याचा देखील राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची दाट शक्यतता वर्तवली जात आहेे.
 खडसेचा हा  पक्षप्रवेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती आहे.

 रविवारी दिवसभर एकनाथ खडसेंच्या राजीनाम्याची बातमी माध्यमात झळकली होती, मात्र भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भातील माहितीचेे खंडण केलं आहे.  खडसे पक्षांतर करणार नाही असं  देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *