Fri. May 7th, 2021

‘कार्टून्स काढण्यापेक्षा एकत्र येऊन विकास पाहू’ – चंद्रकांत पाटील

राज ठाकरे यांनी दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे जाहीर केले होते.

भाऊबीजनिमित्त या मालिकेतील सहावे व्यंगचित्र भाऊबीजनिमित्त रेखाटले आहे. या सहाव्या व्यंगचित्रातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे.

2014 मध्ये खोटी आश्वासनं देऊन भाजपाने सत्ता मिळवली. पण 2019 मध्ये तसं होणार नाही, ‘भारतमाता’ पुन्हा मोदींना ओवाळणार नाही, असे राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून म्हटले आहे.

यात मोदी आणि भारतमातेला दाखवण्यात आले आहे. भारतमातेकडून ओवाळून घेण्यासाठी मोदी पाटावर बसल्याचे दाखवले आहे. मात्र, भारतमातेसमोर 2014 मधील आश्वासनं आणि 2018 मधील परिस्थिती दाखवण्यात आली आहे.

तर तिथेच राज ठाकरेंनी सरकारवर टीका करण्यासाठी काढलेल्या व्यंगचित्राला चंद्रकांत पाटीलांनी प्रत्युत्तर दिलंय…

  • राज ठाकरेंना एकत्र प्रवास करण्याचे आवाहन
  • कार्टून्स काढण्यापेक्षा एकत्र प्रवास करून झालेला विकास पाहू
  • महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
  • उद्धव ठाकरेंसोबत एकत्र प्रवास केल्याने त्यांनी कामाची स्तुति केली
  • तुम्हीही एकत्र येऊन विकास पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *