Mon. May 17th, 2021

चंद्रपुरची दारूबंदी कायम राहणार की उठणार?

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीची समिक्षा तब्बल 5 वर्षांनी करण्यात येत आहे. जनतेचा कौल घेत आहेत. दारुबंदीचे फायदे व नुकसान याची समिक्षा करून पुढील निर्णय शासन घेणार आहे.

दारुबंदी जनमत कौल गेल्या १ महिन्यापासून घेतला जात आहे. यामध्ये आतापर्यत राज्य शुल्क उत्पादन विभागाला २ लाख ८२ हजार ४१२ निवेदनं प्राप्त झाली आहेत.

एकूण २ लाख ८२ हजार ४१२ निवेदनांपैकी 2 लाख 78 हजार 981 निवेदनं ही लेखी तर 3 हजार 431 निवेदनं ही मेलद्वारे प्राप्त झाली आहेत.

निवेदन देण्याची अंतिम तारीख ही 25 फेब्रुवारी होती. शेवटच्या दिवशी निवेदन देणासाठी मोठ्या प्रमाणात जनतेने गर्दी केली होती.

दारूबंदीच्या बाजूने एकूण 20 हजार 800 नागरिक समर्थनात आहे. तर दारूबंदीच्या विरोधात एकूण 2 लाख 61 हजार 612 नागरिकांनी आपला अभिप्राय नोंदवला आहे.

हा संपूर्ण अहवाल समिक्षा समितीकडे पाठविला जाणार आहे. यानंतर दारूबंदीची संपूर्ण समिक्षा केली जाणार आहे. यानंतर हा अहवाल राज्याच्या कॅबिनेट पुढे सादर होणार आहे.

यानंतर राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेणार आहे.

या संपूर्ण निवेदनाद्वारे नागरिकांच्या मनात मात्र शंका निर्माण करण्यात आली आहे. कारण दारूबंदीचा निर्णय जिल्ह्यातील संपूर्ण महिला वर्गानी घेतला होता.

दारूमुळे अनेकांचे परिवार उध्वस्त झाले, असा तर्क शासनाला देण्यात आला.

पण आता दारुबंदीचे समर्थन हे 22 लाख नागरिकांतून फक्त 20 हजार नागरिकांनीच केले होते का? असा प्रश्न आता सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *