Maharashtra

चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, तर आशिष शेलार मुंबई अध्यक्षपदी

चंद्रकांत पाटील यांचा शिंदे सरकारमध्ये समावेश करण्यात आल्यानंतर भाजपच्या प्रदेशाक्षपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडेच भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आलं आहे. तर मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्रकही जारी करण्यात आले आहे. बावनकुळे हे ओबीसी नेते आहेत. तर शेलार हे मराठा समाजातून येतात. त्यामुळे भाजपने मराठा आणि ओबीसी नेत्यांना महत्त्वाचे पद देऊन जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा फायदा भाजपला येत्या काळात होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

चंद्रकांत पाटील हे राज्यात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. त्यामुळे त्यांचं प्रदेशाध्यक्षपद रिक्त होतं. हे पद कुणाकडे जाणार याची जोरदार चर्चा होती. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे आणि राम शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. दोन्ही नेते ओबीसी असल्याने ही उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचली होती. मात्र, बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ टाकण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच बावनकुळे यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात फडणवीस यांच्याप्रमाणेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही मोठा हात असल्याचं सांगितलं जात आहे.

शेलार मुंबईच्या अध्यक्षपदी

दरम्यान, आशिष शेलार यांची दुसऱ्यांदा मुंबईच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांची मंत्रिपदी वर्णी लागणल्यानंतर त्यांचं पद रिक्त होते. त्यामुळे शेलार यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच शेलार यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. शेलार अभ्यासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा महापालिका निवडणुकीत होणार असल्याने त्यांच्याकडे मुंबईची सूत्रे दिली असल्याचं सांगितलं जात आहे.

manish tare

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

7 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

7 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

7 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

7 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

1 week ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

1 week ago